
राष्ट्रीय समाज पक्ष हा सामाजिक विकास करण्यासाठीच आहे. जर गुजरात राज्यात रासपला संधी मिळत असेल, तेथील जनता रासप उमेदवार निवडून देत असेल तर मी या पक्षाचा संस्थापक आहे व हा माझा जिल्हा आहे.
वडूज : राष्ट्रीय समाज पक्ष हा सामाजिक विकास करण्यासाठीच आहे. जर गुजरात राज्यात रासपला संधी मिळत असेल, तेथील जनता रासप उमेदवार निवडून देत असेल तर मी या पक्षाचा संस्थापक आहे व हा माझा जिल्हा आहे. येथील जनताही माझे उमेदवार नक्कीच निवडून देईल, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी वडूज नगरपंचायत पार्श्वभूमीवर येथील रासप संपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वडूज येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली नाना सरगर, युवक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित दादा पाटील, जेष्ठ नेते भाऊसाहेब वाघ, बबनराव विरकर, काशिनाथ शेवते, जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, महिला जिल्हाध्यक्ष पूजा घाडगे, सचिन होनमाने, विलास चव्हाण, संतोष कमाने, शशिकांत देशमुख, सिद्धनाथ गोडसे, हरिदास जाधव, आकाश विरकर नानासाहेब घाडगे , श्रीकांत राजपूत, दीपक खिलारे, नितीन पडळकर, हनुमंत घाडगे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल अण्णा घाडगे, नवराज काळे, सतीश रायबोले जितेंद्र तुपे यांनी स्वागत केले.