आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज

मागील वर्षी ९ हजार ६८४ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली होती. मात्र यंदा सरकारने २५ टक्के राखीव जागांसाठी राज्यात एकूण शाळा किती आणि त्या कोणत्या आहेत, ही माहिती जाहीर केलेली नाही. मात्र वेळापत्रक जाहीर करून शिक्षण विभाग खासगी संस्थाचालकांचे यंदाही उखळ पांढरे करून देण्याचा घाट घालत आहे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  पिंपरी : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांतील २५ टक्के राखीव प्रवेशाच्या जागांसाठी शिक्षण विभागाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. १ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. मात्र हे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी राज्यातील खासगी शाळांची कोणतीच नोंदणी करण्यात आलेली नाही.पालक संघटनांनी खासगी शाळांची नोंद न झाल्याने आक्षेप घेतले आहेत.

  मागील वर्षी ९ हजार ६८४ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली होती. मात्र यंदा सरकारने २५ टक्के राखीव जागांसाठी राज्यात एकूण शाळा किती आणि त्या कोणत्या आहेत, ही माहिती जाहीर केलेली नाही. मात्र वेळापत्रक जाहीर करून शिक्षण विभाग खासगी संस्थाचालकांचे यंदाही उखळ पांढरे करून देण्याचा घाट घालत आहे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यात ४० हजाराहून अधिक खासगी संस्था आणि व्यवस्थापनाच्या शाळा आहेत. यातील प्रत्येक शाळांना आरटीई अंतर्गत मान्यता घेऊन त्यासाठी होणाNया प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक आहे; मात्र शिक्षण विभागातील काही अधिकाNयांच्या संगनमताने तब्बल ३० हजाराहून अधिक शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असले तरी शाळा नोंदणीसाठी त्याच कालावधीमध्ये शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया राबविली जाते. काही नवीन शाळांमध्ये होणारे बदल आणि मागील वर्षाची शाळांची यादी या प्रवेशासाठी गृहीत धरली जाते.

  असे आहे संभाव्य वेळापत्रक

  १) पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे : १ ते २८ फेब्रुवारी २०२२
  २) शाळास्तरावर पुनर्तपासणी करणे : २८ डिसेंबर ते १७ जानेवारी
  ३) सोडत काढणे : ८ आणि ९ मार्च २०२२
  ४) कागदपत्रांची पडताळणी : १० ते ३१ मार्च २०२२
  ५) प्रतिक्षा यादी टप्पा १ : १ ते ७ एप्रिल २०२२
  ६) प्रतिक्षा यादी टप्पा २ : ११ ते १९ एप्रिल २०२२
  ७) प्रतिक्षा यादी टप्पा ३ : २५ ते २९ एप्रिल २०२२
  ८) प्रतिक्षा यादी टप्पा ४ : २ ते ९ एप्रिल २०२२