Sadabhau Khot's serious allegations against Health Minister Rajesh Tope

आरोग्य भरतीच्या परीक्षेवेळी राजेश टोपे यांनी दहा पंधरा लाखांत उत्तर पत्रिका विकल्या असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे(Sadabhau Khot's serious allegations against Health Minister Rajesh Tope). राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल आरोग्य भरतीची ग्रुप ड वर्गाची परीक्षा परत घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर आमदार सदाभाऊ खोत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

  जालना : आरोग्य भरतीच्या परीक्षेवेळी राजेश टोपे यांनी दहा पंधरा लाखांत उत्तर पत्रिका विकल्या असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे(Sadabhau Khot’s serious allegations against Health Minister Rajesh Tope). राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल आरोग्य भरतीची ग्रुप ड वर्गाची परीक्षा परत घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर आमदार सदाभाऊ खोत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

  राज्यात आरोग्य भरती परीक्षेच्या घोटाळ्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. आरोग्य भरतीचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला होता. आरोग्य भरतीच्या गट ड वर्गाचा पेपर व्हायरल झाला होता, त्यामुळे आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे.

  राज्यात मागच्या काळात आरोग्य भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहेत. आरोग्य भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात विधानसभेत आश्वासन दिले होते. पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते.

  पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ‘ड’ वर्गाचा पेपर पूर्ण व्हायरल झाला होता, त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहोत असे राजेश टोपे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा झाली आहे. दोन्ही ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ. मंत्रीमंडळाचा निर्णय आहे त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यात झाला असल्याचे राजेश टोपे म्हणाले काल माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

  विधानसभेतही गाजला होता मुद्दा

  कोरोनामुळे राज्यात दोन वर्ष स्पर्धा परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार निराशेत होते. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण कमी होवू लागले आणि परीक्षा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु टीईटी परीक्षा, आरोग्य भरती, म्हाडा या परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचे पेपेर फुटल्याचे समोर आले. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी मोठे रॅकेट सर्वांसमोर आले. त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले होते. राज्याच्या विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला होता.