बँकेत गहाण असलेल्या प्लॉटची ३० लाखांनी विक्री; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

प्लॉट त्याने पंजाब नॅशनल बँकेत गहाण ठेवला. प्लॉट गहाण असतानाही विकेशने राहुल यांच्यासोबत प्लॉटविक्रीचा व्यवहार केला. त्यांच्याकडून ३० लाख ४० हजार रुपये घेतले. रजिस्ट्री करून देण्यास विकेश हा टाळाटाळ करू लागला. प्लॉट बँकेत गहाण असल्याचे राहुल यांना कळाले. राहुल यांनी पैसे परत मागितले.

    नागपूर (Nagpur) : बँकेत गहाण असलेल्या प्लॉटची ३० लाखांनी विक्री करून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पारडी पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. विकेश कैलास जोशी व आकाश राकेश त्रिपाठी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. राहुल कमलकुमार जैन (वय ३६, रा. इतवारी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. विकेशचा पारडीतील दिनबंधू भूमी विकास संस्था लेआउट येथे प्लॉट आहे.

    हा प्लॉट त्याने पंजाब नॅशनल बँकेत गहाण ठेवला. प्लॉट गहाण असतानाही विकेशने राहुल यांच्यासोबत प्लॉटविक्रीचा व्यवहार केला. त्यांच्याकडून ३० लाख ४० हजार रुपये घेतले. रजिस्ट्री करून देण्यास विकेश हा टाळाटाळ करू लागला. प्लॉट बँकेत गहाण असल्याचे राहुल यांना कळाले. राहुल यांनी पैसे परत मागितले. विकेश व आकाश हे दोघे राहुल यांच्या घरी गेले. त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. राहुल यांनी पारडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.