दीड लाख जनावरांना लाळखुरकत लसीकरण; साथीचा फैलाव नियंत्रणात

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत साथीचा रोग (Epidemic) वाढला होता. परिणामी, अनेक भागातील जनावरे दगावली होती. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने जनावरांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार आणि लाळ खुरकतचे लसीकरण सुरू केले. जिल्ह्यात सर्वाधिक लाळ खुरकतीचे ३ लाख ५० हजार पशूंचे लसीकरण झाले आहे.

    सांगली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत साथीचा रोग (Epidemic) वाढला होता. परिणामी, अनेक भागातील जनावरे दगावली होती. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने जनावरांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार आणि लाळ खुरकतचे लसीकरण (Vaccination) सुरू केले. जिल्ह्यात सर्वाधिक लाळ खुरकतीचे ३ लाख ५० हजार पशूंचे लसीकरण झाले आहे.

    घटसर्प, फयासह आंत्रविषार लसीकरण सुरु आहे. जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ३ हजार ५९३ आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पशूधनांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले जाते. मात्र, पावसाळ्यात गायी-मेंढ्यांना आंत्रविषार असा साथीच्या रोगाचा फटका बसतो. यामुळे जनावरांना साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार या रोगाच्या लसी जनावरांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ७ लाख ३७ हजार लाळखुरकत लसींची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र, लाळ खुरकतच्या लसी आल्या नव्हत्या. त्यामुळे लसीकरण सुरू झाले नव्हते.

    दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात आटपाडी, मिरज तालुक्यातील जनावरे साथीच्या रोगाने दगावली होती. मात्र, तरीदेखील म्हणावे असे लसीकरणाला गती आली नव्हती. ज्या भागात साथीच्या रोगाने जनावरे दगावली त्या भागात लसी देण्यात येत होत्या. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडून २० हजार डोस घेऊन लसीकरण सुरुवात केली. त्यामुळे साथीच्या रोगाने जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होत आहे.