खटाव येथे अनधिकृत वाळू तस्करीवर एलसीबीची धाड; २६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    सातारा : खटाव गावाच्या हद्दीत भराडे वस्ती येथील येरळा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करताना चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री जेरबंद केले. या प्रकरणी पोलिसांनी एक जेसीबी, दोन वाळू ट्रॉली व पाच ब्रास वाळू उपसा २६ लाख १४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    पोलीस अधीक्षक अजय कुमार, अजित बोऱ्हाडे अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अवैध वाळू उत्खनन व चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर परिणामकारक कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून जिल्ह्यात अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना शुक्रवारी उशिरा खास बातमीदारांकडून बातमी मिळाली की, पुसेगांव पोलीस ठाणे हद्दीत खटाव गांवचे हद्दीत भराडे वस्ती येथील येरळा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन चालु आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ व त्यांचे पथकास बातमीचा आशय सांगून अवैध वाळू उपसा करणाऱ्या इसमांनावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सुचना दिल्या.

    या अनुषंगाने 25 डिसेंबर रोजी पहाटे 2.45 च्या सुमारास खटाव ता.खटाव जि. सातारा गांवचे हद्दीत भराडे वस्ती येथे येरळा नदीचे पात्रात अचानक पोलीस पथकाने छापा टाकला. त्यावेळी काही इसम जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने वाळू उपसा करून नदीपात्राजवळ वाळूचा डेपो करीत होते. सदर ठिकाणी अंदाजे ५ ब्रास वाळूचा डेपो तयार केला असल्याचे निदर्शनास आले. सदर बाळु डेपोवरती महसुल विभागामार्फत कारवाई करणे तजवीज ठेवली व त्यावेळी सदर इसमानां नमुद जेसीबी व वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे येथे हजर केले.