राज्य सरकारवर संजय राऊतांची जहरी टीका; म्हणाले, ‘जरांगे पाटलांना पुन्हा आंदोलन…’

आरक्षण निर्णयाचे स्वागत करत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने पुन्हा आंदोलनाची वेळ त्यांच्यावर आणू नये असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

    छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये आरक्षणाचा (Reservation) मुद्दा प्रकाशझोतामध्ये आलेले असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला यश आले आहे. राज्य सरकारने (State Govt) जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यावर आता विविध पक्षांतील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्य़ास सुरुवात केली आहे. अनेकजण हा आरक्षण (Maratha Reservation) निर्णयाचे स्वागत करत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने पुन्हा आंदोलनाची वेळ त्यांच्यावर आणू नये असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

    मराठा आरक्षणाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक वातवरण गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. मनोज जरांगे पाटील हा एक हट्टा माणूस लाखो मराठ्यांना घेऊन मुंबईकडे जेव्हा निघाले तेव्हा नक्कीच त्यातून मार्ग निघावा अशी सगळ्यांचीच भूमिका राहिली. सगे सोयरे,सरसकट,कुणबी दाखले हे सर्व सरकारने काढलेल्या आदेशानुसार मार्गी लागतेय का हा येणारा काळच सांगेल. सरकारने आश्वासन दिले आहेत,अद्यादेश काढले आहेत पण मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे. असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

    संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जहरी टीका करत राज्याचा विकास होत नसल्याचे सांगितले. राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील, मुंबईतील रोजगार बाहेर जातोय यावर मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. ही कोणाची भीती आहे. महाराष्ट्र लुटला जातो आहे,महाराष्ट्राचा रोजगार पळवला जातो आहे. आता राम राज्य आलेले नाही, पलटूरामाचे राज्य आले आहे, हाच लोकशाहीला मोठा धोका आहे. रामराज्य आलं असते तर एवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. यापेक्षा रावणाचे राज्य चांगले होते अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी सरकारवर केली आहे.