शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले….

नवीन वर्षात हे सरकार जावून गुढीपाडव्यापर्यंत नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाईल, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाबाबत राऊतांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील (Sanjay Raut On Chandrakant Patil Statement)आतापर्यंत २८ वेळा असे बोलल्याची माझ्याकडे नोंद आहे. त्यांना बोलत राहू द्या,असे संजय राऊत म्हणाले.

    मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. नवीन वर्षात हे सरकार जावून गुढीपाडव्यापर्यंत नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाईल, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाबाबत राऊतांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील (Sanjay Raut On Chandrakant Patil Statement)आतापर्यंत २८ वेळा असे बोलल्याची माझ्याकडे नोंद आहे. त्यांना बोलत राहू द्या. ते भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांना असे बोलणे गरजेचे आहे. त्याने हे सरकार जात नाही. हे सरकार पुढील २५ वर्षे टिकेल. या सरकारचे पॉवर सेंटर जिथे आहे तिथे आता उभा असल्याचे राऊत म्हणाले.

    राऊत म्हणाले की, एसटीच्या संपात तेल ओतण्याचे काम कोण आणि का करते ? यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत. मला आजच्या पवारसाहेबांच्या बैठकीतून समजले की त्यांनी काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत.

    बहुतेक ‘त्या’ शपथविधीचे झटके बसत असावेत
    राऊत म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. बहुतेक त्याच शपथविधीचे झटके पाटलांना बसत असावेत. म्हणून ते सारखे म्हणत आहेत की सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा, एवढंच मी त्यांना सांगेन, असा टोलाही राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.