शालेय मित्राचा विवाहितेवर अत्याचार; गरिबीचा घेतला गैरफायदा

पीडित महिला आणि आरोपी रोशन हे शालेय मित्र होते. दरम्यान, महिलेचे लग्न झाले तिला दोन मुले झाली. रोशन हा आरटीओमध्ये दलाल आहे. दोन वर्षांपूर्वी वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी महिला रोशनकडे गेली होती. त्यावेळी रोशनने तिची विचारपूस केली असता आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याचे तिने सांगितले. याच परिस्थितीचा फायदा घेत त्याने...

    नागपूर,  नोकरी लावून देण्याच्या बदल्यात शालेय मित्र तिचे शारीरिक शोषण करू लागला. तिने विरोध केल्यास पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत होता. अत्याचार वाढतच चालल्याने तिने गिट्टीखदान पोलिसात त्याच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी पीडित 37 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. रोशन अशोक खोडे (39) रा. नर्मदा कॉलनी असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

    पीडित महिला आणि आरोपी रोशन हे शालेय मित्र होते. दरम्यान, महिलेचे लग्न झाले तिला दोन मुले झाली. रोशन हा आरटीओमध्ये दलाल आहे. दोन वर्षांपूर्वी वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी महिला रोशनकडे गेली होती. त्यावेळी रोशनने तिची विचारपूस केली असता आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याचे तिने सांगितले. याच परिस्थितीचा फायदा घेत त्याने तिला एका आश्रमशाळेत नोकरीला लावून दिले. त्यानंतर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत तो तिचे लैंगिक शोषण करीत होता. महिलेने विरोध केल्यास तो तिच्या पती व मुलांना मारण्याची धमकी देत होता.

    दोन दिवसांपूर्वी त्याने तिला बेदम मारहाणही केली. त्याच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून रोशनला अटक केली.