पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून रेग्यूलर सुरू होणार; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

पहिली ते चौथीच्या शाळा अखेर १ डिसेंबरपासून रेग्यूलर सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली(Schools 1 to 4 will start regular from December 1; Announcement by School Education Minister Varsha Gaikwad).

    मुंबई : पहिली ते चौथीच्या शाळा अखेर १ डिसेंबरपासून रेग्यूलर सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली(Schools 1 to 4 will start regular from December 1; Announcement by School Education Minister Varsha Gaikwad).

    सुरुवातीला नववी आणि दहावीचे वर्ग सुरु करण्यात आले. यानंतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र, प्राथमिक वर्गाच्या म्हणजेच पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याबाबत सरकार विचार विनीमय करत होते. अखेर पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंजुरीसाठी पाठवली होता. आज मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आता राज्यात पहिली ते दहावीच्या शाळा रेग्यूलर सुरू होणार आहेत.

    इतर वर्ग सुरु करताना ज्याप्रमाणे  करोना नियमावली जाहीर करण्यात येईल त्या प्रमाणे पहिली ते चौथीच्या शाळा देखील या करोना नियमावली नुसारच सुरु करण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

    आगामी काळात या वर्गांसाठी लागू करावयाच्या नियमावलीबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करून शाळा सुरु करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. यासाठी पालकांची संमती बंधनकारक असणार आहे. शाळेत मुलांना सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरण कसं दिलं जाईल, याची काळजी घेतली जाईल”, असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगीतले.

    पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान म्हणजेच सात ते दहा वर्षे वयोगटातील असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.