शिवाजी विद्यापीठ कबड्डीसंघात लिबर्टीच्या धनराज शेटेची निवड

लिबर्टी मजदूर मंडळ कराडचा अष्टपैलू , मेहनती व एकनिष्ठ खेळाडू धनराज धनंजय शेटे याची शिवाजी विद्यापीठाच्या कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे. कबड्डी खेळात धनराज शेटे हा अष्टपैलू खेळाडू आहे.

    कराड : लिबर्टी मजदूर मंडळ कराडचा अष्टपैलू , मेहनती व एकनिष्ठ खेळाडू धनराज धनंजय शेटे (Dhanraj Shete) याची शिवाजी विद्यापीठाच्या कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे. कबड्डी खेळात धनराज शेटे हा अष्टपैलू खेळाडू आहे. वेस्ट झोन विद्यापीठ कबड्डी स्पर्धा अमरावती येथे असून, या स्पर्धेस शिवाजी विद्यापीठ संघ रवाना झाला आहे. धनराज शेटे हा डावा कोपरारक्षक व चढाईपट्टू आहे.

    धनराज हा लिबर्टी मजदूर मंडळात नियमित सराव करत असून, तो डॉ. दौलतराव आहेर इंजिनिअरिंग कॉलेज येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. कॉलेजचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. आयुब कच्छी यांचे त्यास मार्गदर्शन लाभले आहे. धनराजच्या यशाबद्दल कॅालेजचे प्रमुख डॉ. अशोकराव गुजर, नगरसेवक इंद्रजित गुजर, डॉ. माधुरी गुजर, प्राचार्य डॉ. अन्वर मुला, उपप्राचार्य कुंभार, प्रा. आयुब कच्छी, किरण पवार, अभिजित शिंदे यांनी धनराजला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    या निवडीबद्दल लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष अरुण जाधव, मुनीरभाई सावकार, सुभाष डोळ, ऍड. मानसिंगराव पाटील, रमेश जाधव, काशिनाथ चौगुले, प्रशिक्षक भास्कर पाटील, सचिन पाटील, विनायक पवार, राजेंद्र जाधव, सुरेश थोरात, विजय गरुड, इंद्रजीत पाटील, तानाजी पवार, अमित शिंदे, राजेंद्र पवार, जितेंद्र जाधव, विशाल शिंदे, दादासाहेब पाटील, विनोद कसबे, अर्जुन पवार यांनी अभिनंदन केले आहे.