sell of ‘fake pressure cooker’; Notice to Amazon, Flipkart

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) अॅमेझॉन, फ्लीपकार्ट आणि पेटिएममॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांसह अन्य विक्रेत्यांना भारतीय मानक ब्युरोच्या (बीएसआय) नियमांचे पालन न करता प्रेशर कुकर विक्रीस काढल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे(Cell of ‘fake pressure cooker’; Notice to Amazon, Flipkart).

    दिल्ली : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) अॅमेझॉन, फ्लीपकार्ट आणि पेटिएममॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांसह अन्य विक्रेत्यांना भारतीय मानक ब्युरोच्या (बीएसआय) नियमांचे पालन न करता प्रेशर कुकर विक्रीस काढल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे(Cell of ‘fake pressure cooker’; Notice to Amazon, Flipkart).

    सीसीपीएने 18 नोव्हेंबर रोजीच या ई-कॉमर्स कंपन्या व त्यांच्या वेबसाईटवर प्रेशर कुकरची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना नोटीस बजावली. विक्री नियमांचे उल्लंघन केल्याचा या सर्वांवर आरोप आहे. आदेशानुसार घरगुती वापराचा प्रेशर कूकर आयएस 2347:2017 होणे आवश्यक आहे.

    सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉनवर 2 , फ्लीपकार्टवर 3, स्नॅपडीलवर 2, शॉपक्लूझवर 3 आणि पेटीएम मॉलवरही 3 कंपन्यांचे प्रेशर कुकर नियमांचे वापर न करता विक्री केले जात होते असा आरोप आहे. या आरोपावरून सीसीपीएने या कंपन्यांना सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले असून त्यांच्यावर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाईचा इशाराही दिला आहे.