शाहरुखच्या मन्नतमध्ये उडाला गोंधळ; दोन तरुण आले आणि शिरले थेट बंगल्यात.., मग पुढं..

या दोघांनी थेट शाहरुखला भेटण्याचाच निर्णय घेतला. बंगल्याच्या सुरक्षा व्यवस्थेला न जुमानता थेट त्यांनी मन्नतमध्ये शिरण्याचाच प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं, तरीही ते ऐकत नव्हते. अखेरीस या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

मुंबई– पठाण (Pathan) सिनेमामुळं पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) चाहत्यांची संख्या कमी नाही. शाहरुखचे अनेक चाहते लाखोंच्या संख्येनं आहेत. आपल्या सुपरस्टारला (Superstar) पाहण्यासाठी हे चाहते जीवाचा आटापिटा करती असतात. त्याला एकदा भेटता यावं, हे करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचीही त्यांची तयारी असते. मुंबईतील शाहरुख खानच्या मन्नत हा बंगला आणि या बंगल्याबाहेर उभं राहून त्याची एक झलक पाहयला मिळावी, यासाठी हजारो तरुण दररोज मुंबईत येत असतात. त्याच्या बंगल्याबाहेर उभं राहून शाहरुख एकदा तरी दृष्टीस पडावा, याची ते वाट पाहात असतात. अशाच काही तरुणांनी शहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर गोंधळाची स्थिती निर्माण केली होती.

दोन तरुण थेट शिरले शाहरुखच्या बंगल्यात…

19-20 वर्षांचे दोन तरुण असेच शाहरुखला पाहण्यासाठी गुजरातमधून मुंबईत आले होते. मन्नत बंगल्याबाहेर पोहचल्यानंतर, केवळ बाहेरुन बंगला पाहून त्यांचं समाधान झालं नाही. या दोघांनी थेट शाहरुखला भेटण्याचाच निर्णय घेतला. बंगल्याच्या सुरक्षा व्यवस्थेला न जुमानता थेट त्यांनी मन्नतमध्ये शिरण्याचाच प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं, तरीही ते ऐकत नव्हते. अखेरीस या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या घटनेमुळं शाहरुखची लोकप्रियता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दररोज हजारो जण याचसाठी येतात मुंबईत

देशभरावर असलेल्या बॉलिवूडच्या गारुडामुळं दररोज हजारो तरुण-तरुणी हे ही सिनेसृष्टी पाहण्यासाठी किंवा मोठ्या पडद्यावर एकदा तरी दिसावं यासाठी मुंबईत येत असतात. अनेकदा घरच्यांचा विरोध पत्करुन, घरातून पळून येऊन नवं नशीब आजमायला ही तरुणाई मुंबईत येते. त्यातले बोटावर मोजण्याइतकेच या फिल्मी दुनियेत यशस्वी होतात. तर अनेकांना आयुष्यभर वाटच पाहावी लागते.