शाहरुख खानच्या घरी बाप्पाचं आगमन! सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वांना गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा

फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"गणपती बाप्पाचं घरी स्वागत करत आहोत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.

    देशभरात गणेशोत्सव धुमधड्याक्यात साजरा करण्यात येत आहे. काल देशभरात गणपतीची स्थापना करण्यात आली. यामध्ये आपले सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी कसे मागे राहणार, बॅालिवूडचा किंग खानच्या घरीही मंगळवारी गणपतीची स्थापना करण्यात आली. शाहरुख खानने सोशल मीडियावर फोटो शेअरा करत सर्वांना गणेश चर्तुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

    शाहरुख खानच्या घरी बाप्पाचं आगमन

    मंगळवारी बॅालीवूडमधील अनेक कलाकार मंडळीच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. यामध्ये अभिनेता सलमान खान, अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अर्पिता खान, यांच्यासह अनेक कलाकार मंडळीनी वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाची घरी स्थापना केली.  बॅालिवूडचा किंग खान यानेही त्याच्या मन्नत बंगल्यावर गणपतीची स्थापना केली. (Shah Rukh Khan Post On Ganeshotsav 2023)

    बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत दिल्या शुभेच्छा

    शाहरुख खानना बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,”गणपती बाप्पाचं घरी स्वागत करत आहोत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. सर्वांना सुख, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक खाण्यासाठी गणपती बाप्पा आशीर्वाद देवो”. शाहरुखची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांना त्यांच्या लाडक्या सुपरस्टारला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.