शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे; नारायण राणे यांचा हल्लाबोल

मंत्री अनिल परब आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. तब्बल ४- साडे ४ तास चाललेल्या बैठकीतून राज्य सरकारने कोणताही मार्ग काढला नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधता टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. 

    मुंबई : ऐन दिवाळ सणाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरणाची मागणी करत आझाद मैदानावर राज्य सरकारविरोधात आंदोलन सुरु केले होते.

    दरम्यान याच पार्श्वभूमीवर काल परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. तब्बल ४- साडे ४ तास चाललेल्या बैठकीतून राज्य सरकारने कोणताही मार्ग काढला नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधता टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

    नारायण राणे नेमकं काय म्हणाले? 

    माध्यमांशी संवाद साधतांना राणे म्हणाले की,’शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाहीत. ते निर्देश देऊ शकत नाहीत का? ज्यांनी सरकार बनवलं ते सांगू शकत नाहीत का की कर्मचाऱ्यांना ताबडतोब न्याय द्या.’ तसेचं पुढे ते म्हणाले की,’केंद्र सरकारने थेट महाराष्ट्र सरकाला निर्देश द्यावेत की हा प्रश्न त्वरीत मिटवा किंवा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ. जो मार्ग अवलंबवायचा त्याबद्दल मी स्वत: पंतप्रधान मोदींशी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल आणि यातून मार्ग लवकरच काढावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना यातून वाचवावं एवढं मी सांगेन. तसेच राज्यामध्ये जे कोण परिवहनमंत्री आहेत, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी त्यांच्याशी देखील बोलेन’, असेही राणे यावेळी म्हणाले.