The ban on onion export must be lifted, the government does not value farmers' hard work; Sharad Pawar's attack on onion issue
The ban on onion export must be lifted, the government does not value farmers' hard work; Sharad Pawar's attack on onion issue

  नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिकमधील चांदवड येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली असल्याने, कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभा होत आहे. याच सभेतून पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, ही निर्यातबंदी उठवलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

  शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही

  कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. कांदा असं पीक आहे की, त्यामधून दोन पैसे मिळतात. त्यासाठीच शेतकरी कष्ट करतात. पण केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नाही, अशी खरमरीत टीका शरद पवार यांनी केली. कांदा हे लहान व जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. पण दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरवायचे अधिकार आहेत, त्यांच्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळावी, ही भावना नाही.

  शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही

  केंद्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांना ही जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला. ते सोमवारी चांदवडमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या ‘रास्ता रोको’मध्ये सहभागी झाले होते. यावेळी शरद पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. हा एक निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

  शरद पवार चांदवडमधील शेतकऱ्यांच्या आंदोलन ठिकाणी पोहोचले

  कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरात कांद्याचे दर कोसळले असून कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यातील सर्वात अनुभवी आणि शेतीच्या अर्थकारणाची सखोल जाण असलेला नेता म्हणून ओळख असलेले शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. काहीवेळापूर्वीच शरद पवार हे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको सुरु असलेल्या चांदवडमधील आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आहेत.

  नाशिकच्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान

  केवळ कांद्या दर नियंत्रणात करण्यासाठी निर्यातबंदी करणे हे सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरणारे आहे. गारपिटीच्या माऱ्यामुळे द्राक्षाचा मणी फुटल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष तयार झाल्यानंतर गारपिटीमुळे त्याचा मारा द्राक्षाच्या मणीला बसल्याने द्राक्ष उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे. यानंतर आता द्राक्षाला नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. गारपिटीमुळे कांदा उत्पादकांचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे.  आज आपण जे पेट्रोल वापरतो, त्यात इथेनॉलचा समावेश असतो. या सरकारने इथेनॉलचा वापर करावा लागतो. परंतु, या सरकारने 7 डिसेंबरला या इथेनॉलवर बंदी घातली आहे.

   

  शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत नाही

  सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नसून, कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. तसेच, कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे. आम्हाला रस्त्यावर येण्याची हौस नाही, पण, रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, असेही शरद पवार म्हणाले.

  ज्यांच्या हातात धोरणं ठरविण्याचे अधिकार

  यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, सध्याचे राजकर्ते शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण आखणारे नाहीत. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे कष्टाला किंमत नाही. तुम्ही सगळे कष्ट करतायत, पण  सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही. ज्यांच्या हातात धोरणं ठरविण्याचे अधिकार आहेत, त्यांना जाणं नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. मी मागे मनमाडला आलो होतो, तेव्हा मला काही शेतकऱ्यांनी सांगितले की, कांदा संदर्भात काही निर्णय केंद्र सरकार घेत आहे. त्यामुळे मी कार्यक्रम थांबवून तत्काळ दिल्लीला गेलो.

  भाजपचेच लोकं कांद्याच्या माळ गळ्यात घालून संसदेत

  त्यावेळी, भाजपचे लोकं कांद्याच्या माळ गळ्यात घालून आले होते. याबाबत अध्यक्षांना विचारल्यावर कांद्याचे भाव खूप वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कांद्याचे दर कमी करता येणार नाही का? असे मला अध्यक्षांनी विचारले. त्यावर, दोन पैसे शेतकर्याना मिळत असतील तर मिळू द्या असे मी त्यांना सांगितले, असल्याचे पवार म्हणाले.