जालना मराठा आंदोलनात सरकारची एकीकडे चर्चा, तर दुसरीकडे लाठीचार्ज; शरद पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

    जालना : जालन्यामधील मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. आता राज्यातील प्रमुख नेत्यांनी आता जालन्यातील मराठा आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे मराठा आंदोलकांशी चर्चा केली. तर दुसरीकडे आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नव्हता. यामुळे बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलनस्थळाला पवारांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिंदे सरकारव हल्लाबोल केला आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे मराठा आंदोलकांशी चर्चा केली. तर दुसरीकडे आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नव्हता. यामुळे बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलनस्थळाला पवारांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिंदे सरकारव हल्लाबोल केला आहे.

    पवार म्हणाले की, मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. शब्द न पाळल्यामुळे आंदोलन सुरू करण्यात आले. एकीकडे चर्चा केली, तर दुसरीकडे लाठीचार्ज केला. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी  हवेत गोळीबार केला. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने पोलिंसाची कुमक आणण्यात आली होती. अंतरवाली सराटी गावात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.