sharad pawar

जेम्ल लेन याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत आक्षेपार्ह लिखाण केले होते, बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना शिवकालाचे चांगले अभ्यासक असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते. मनसेने बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी पुरंदरेंनी केली होती, या आशयाचे पत्र लिहिले होते, त्याला परवारांनी प्रत्युत्तर दिले आहे(Sharad Pawar's Reply To MNS).

  जळगाव : जेम्ल लेन याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत आक्षेपार्ह लिखाण केले होते, बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना शिवकालाचे चांगले अभ्यासक असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते. मनसेने बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी पुरंदरेंनी केली होती, या आशयाचे पत्र लिहिले होते, त्याला परवारांनी प्रत्युत्तर दिले आहे(Sharad Pawar’s Reply To MNS).

  राज्यातील सामाजिक ऐक्य बिघडण्याची चिंता

  यावेळी शरद पवारांनी राज्यात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र एकसंध राहायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील सामाजिक ऐक्य बिघडेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोग्यांबाबत दिलेल्या अल्टिमेटमच्या निर्णयानंतर आणि आता उद्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी हनुमान आरतीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशा स्थितीत राज्यात सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

  देवेंद्र फडणवीसांना टोला

  देवेंद्र फडणवीसांनी गुरुनारी शरद पवार यांच्याविरोधात टीका करणारे १४ ट्विट काल केले होते. ते पाहून त्याचा आनंद घेतला अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. फडणवीस हे मला जातीयवादी का म्हणतात, हे माहित नसल्याचेही त्यांनी सांगिंतले.
  भाजपाला राज्यात सत्ता मिळवण्याचे स्वप्न  महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपा सातत्याने करीत आहे.मात्र त्यांनां यश मिळत नाही.

  देशात भाजपाकडे नसलेली राज्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात सध्या केंद्रीय यंत्रणा करीत असलेल्या कारवाया हा त्याचाच एक भाग असल्याची टीकाही शरद पवारांनी केली आहे. राज्यातील वीजप्रश्नाकडे आमचे गांभिर्याने लक्ष असल्यातेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.