नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत पळाली; गरोदर राहिल्यानंतर विवाहास नकार

संबंधित पीडित महिला ही 28 वर्षीय आहे. लग्न झाल्यानंतर दोन वर्षे पतीसह सुखी संसार केला. त्यानंतर पतीशी बिनसले. तरणाबांड युवक तिला गवसला. तिचे एका युवकाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. ती पतीला सोडून युवकासाठी माहेरी आली. माहेरी आल्यानंतर तिच्यावर वॉच ठेवणारा तिचा नवरा नव्हता. त्यामुळं शेख शहजाद याच्याकड कामावर असतानात तिने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

    नागपूर (Nagpur) : ही घटना आहे सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. लग्न झाल्यानंतर दोन वर्षे संसार केला. पण, त्यानंतर त्याच्यात तिला काही रस वाटला नाही. दरम्यान, दुसरा तरुण तिच्या जीवनात आला. ती त्याच्यासाठी पतीला सोडून आली. मौजमजा केली. त्याच्यापासून गरोदर राहिली. तरीही तिच्याशी तो लग्न करत नव्हता. म्हणून पीडित युवतीनं पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली.

    सुखी संसाराचा केला त्याग
    संबंधित पीडित महिला ही 28 वर्षीय आहे. लग्न झाल्यानंतर दोन वर्षे पतीसह सुखी संसार केला. त्यानंतर पतीशी बिनसले. तरणाबांड युवक तिला गवसला. तिचे एका युवकाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. ती पतीला सोडून युवकासाठी माहेरी आली. माहेरी आल्यानंतर तिच्यावर वॉच ठेवणारा तिचा नवरा नव्हता. त्यामुळं शेख शहजाद याच्याकड कामावर असतानात तिने शरीरसंबंध प्रस्थापित केले. अविवाहित असलेल्या शेख शहजादने तिचा वापर केला. एक एप्रिल 2020 ते 30 ऑक्टोबर 2021 या कालावधीत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याच्यापासून ती गरोदर राहिल्याच पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलंय.

    लग्नासाठी पाहत होता मुली
    पीडित महिलेने शहजादकडे वारंवार लग्नाचा तगादा लावला. परंतु, तो टाळाटाळ करीत होता. दरम्यान, शहजादच्या घरी त्याला बघायला स्थळे यायला लागली. त्यामुळे ती आणखी चिडली. तिने शहजादला गर्भवती असल्याचे सांगून लग्नाची गळ घातली. मात्र, त्याने नात्यातील मुलगी बघून लग्न करण्याचा निर्णय घेतला. 30 ऑक्टोबर रोजी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. तरीही त्याने लग्नाला नकार दिला. त्यामुळं महिलेनं सक्करदरा पोलिस ठाण्यामध्ये बलात्कार केल्याची तक्रार दिली. सक्करदरा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.