shiv sena asks central government to stop use of loudspeakers on mosques vb

मुंबईत २०१४ साली मालाडमध्ये शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांच्या हत्येप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर एका महिला आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली(Shiv Sena group chief Ramesh Jadhav murder case: Four accused sentenced to life imprisonment; Woman released due to lack of supplies).

    मुंबई : मुंबईत २०१४ साली मालाडमध्ये शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांच्या हत्येप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर एका महिला आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली(Shiv Sena group chief Ramesh Jadhav murder case: Four accused sentenced to life imprisonment; Woman released due to lack of supplies).

    रमेश जाधव यांच्या चुलत भावाने केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना अन्सारी, युसूफ साजिदा, इम्रान काझी आणि एक अल्पवयीन मुलगा मारहाण करत होते आणि जेव्हा त्यांने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. म्हणून त्यांनी रमेश जाधव यांना बोलावून घेतले. जाधव तिथे आल्यावर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी युसुफ आणि इमरान यांनी त्यांना भिंतीवर ढकलले आणि अन्सारीने त्यांच्यावर चाकूने वार केले. तेथे असलेला चौथा आरोपी गुल्लु साजीदाने त्यांच्यावर गुप्तीने वार केले. यामध्ये जाधव जबर जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

    या प्रकरणी पोलिसांनी २२ ऑक्टोबर रोजी सर्व आरोपींना अटक करून हत्या, कट कारस्थान, गंभीर मारहाण इत्यादी कलमातर्गत गुन्हे नोदवले. या खटल्यात वीस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून पोलिसांना घटनास्थळी लोखंडी सळ्या, रक्ताळलेले कपडे आणि हत्यारे सापडली. तर चौथा आरोपी गुल्लुने लपवलेले कपडे स्वतःहून पोलिसांना सांगितले असल्याचा दावा सरकारच्यावतीने करण्यात आला. या खटल्यात तीन प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि सीसीटीव्ही फुटेज, न्यायवैद्यकीय अहवाल महत्त्वाचा ठरला असल्याचेही त्यांना पुढे स्पष्ट केले.

    गुल्लूसह दोन आरोपींनी जाधव यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेल्याचा दावा आरोपीच्या भावांकडून करण्यात आला. परंतु, आरोपींच्या उलटतपासणीत, रुग्णालयातील त्यांचा प्रवेश किंवा रुग्णालयामधील सीसीटीव्ही फुटेजबाबत सबळ माहिती ते न्यायालयात सादर करू शकले नाहीत. त्यांचा युक्तिवाद विश्वासहार्य नसून भावांची निर्दोष मुक्तता करण्याचा प्रयत्न करत असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. त्याची दखल घेत न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

    दुसरीकडे, या प्रकऱणातील अल्पवयीन आरोपीवर बाल न्याय मंडळात खटल्या न्यायप्रविष्ट असून या घटनेनंतर उसळलेल्या दंगलीमधली कथित दंगल खोरांविरोधातील खटलाही प्रलंबित आहे.