शिवप्रतापदिन यंदा साध्या पध्दतीने साजरा; ‘ओमायक्राॅन’च्या पार्श्वभूमीवर निर्णय

ओमिक्राॅन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतापदिन यंदा मोजक्या शासकिय अधिकारी आणि कमर्चारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

  महाबळेश्वर : ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतापदिन यंदा मोजक्या शासकिय अधिकारी आणि कमर्चारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

  किल्ले प्रतापगडाच्या दैदिप्यमान कामगिरीचा इतिहास सांगणारा दिन प्रत्येक मराठ्याचे रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना १० नोव्हेंबर १६५९ रोजी घडली होती. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच शिवप्रताप दिन दरवर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवप्रताप दिनाचे आयोजन करण्यात येते या वर्षी देखील ओमिक्राॅन संसर्गाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पध्दतीने मोजक्या शासकिय अधिकारी आणि कमर्चारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.

  ओमिक्राॅन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासने १४४ कलम लागू केल्याने या वर्षी किल्लेप्रतापगडावर शिवप्रतापदिन अत्यंत साधेपणाने कोरोना प्रीबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शासनाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  अफझल खानाचा वध करून छत्रपती शिवाजी महराजांनी हिंदवी स्वराजाची मुहूर्त मेढ रोवली. या शिवरायांच्या पराक्रमानिमित प्रती वर्षी किल्ले प्रतापगडावर पूर्वी हा सोहळा प्रतापगड उत्सव समिती व महाराष्ट्रातील विविध भागातील शिवप्रेमी मोठ्या जल्लोषात साजरे करायचे त्यानंतर गेले १० -१२ वर्षापासून आज तागायत शासनाच्या वतीने तो साजरा केला जातो. मात्र, यावर्षी केवळ शासनाच्या सहभागातूनच पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र, नेहमी दिसणारे शालेय विध्यर्थी ,लोक प्रतिनिधी, ग्रामस्थ व शिवप्रेमिच्या सहभाग यांचा अभाव चांगलाच जाणवत होता.

  जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किल्ल्याकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर व ठिकाणी सर्वांचे पोलीस खात्याच्या वतीने तपासणी केली जात होती. तसेच गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी सर्वांची कसून तपासणी करून त्यांना किल्ल्यात प्रवेश दिला जात होता. यावेळी कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांनाच गडावर प्रवेश देण्यात आला.

  सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास या वर्षीच्या या सुदिनाच्या कार्यक्रमाने प्रारंभ झाला . अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे ,अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे तसेच उप वन संरक्षक महादेव मोहिते यांच्या शुभ हस्ते भवानी मातेची पूजा व महाआरती करण्यात आली.

  यावेळी डी.वाय एस पी.डॉ.शीतल जानवे खराडे , वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, नायब तहसीलदार श्रीकांत तिडके खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक संदिप भागवात, गटविकास अधिकारी अरुण मरभळ भवानी मातेचे पारंपारिक सेवेकरी अभय हवालदार, भवानी माता मंदिर उपसरपंच जोती जंगम ,व्यवस्थापक ओमकार देशपांडे ,पुजारी मंगेश बडवे ,आनंदा उतेकर ,प्रतिक उतेकर , वनसमिती अध्यक्ष विलास मोरे,बबन कासुर्डे,कादर सय्यद तसेच प्रतापगड ग्रामस्थ उपस्थित होते.

  भवानी मातेच्या मंदीरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण ग्रामपंचायत सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची शिवमुर्ती असलेल्या या पालखीची मिरवणुक सुरु झाली. जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी पालखीचे भोई होऊन पालखीचा शुभारंभ केला. त्यानंतर शिवप्रेमी ग्रामस्थांनी जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात सामाजिक अंतर राखून शिवरायांच्या पुतळ्या पर्यंत पालखी नेली .त्यानंतर पुतळ्या समोरील ध्वजस्तंभावर भगव्याचे ध्वजारोहण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले यावेळी सर्व शासकीय अधिकारी ,मान्यवर उपस्थित होते .त्यानंतर शिवरायांच्या अश्वारूढ शिवपुतळयाचे पूजन व जलाभिषेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

  शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. याच वेळी सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली . या वर्षी प्रतापगड परिसरात शुकशुकाट दिसत होता बाहेरचे शिवप्रेमी व विध्यार्थी वगैरे नव्हते .सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त होता .सर्व कार्यक्रम शांततेत व जल्लोषात साजरा झाला.

  संयुक्त वनव्यवस्थापन समिती प्रतापगड यांच्या वतिने मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.