पनवेलमध्ये शिवसेना आक्रमक; एकनाथ शिंदेंच्या फोटोला फासले काळे

भाजपचा (BJP) बुधवारी पनवेल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जमलेल्या शेकडो शिवसैनिकांनी (Shivsainik) निषेध (Protest) नोंदविला. तसेच, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या फोटोला काळे फासले.

    पनवेल : शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वेळीच जागा दाखवू आणि पक्ष खिळखिळा करण्याचा चंग बांधलेल्या थोतांड भाजपचा (BJP) बुधवारी पनवेल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जमलेल्या शेकडो शिवसैनिकांनी (Shivsainik) निषेध (Protest) नोंदविला. तसेच, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या फोटोला काळे फासले.

    शिरीष घरत म्हणाले, गद्दारांना पक्षात कधीच स्थान नाही. यापुढेसुद्धा ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे. भाजप अशा लोकांना खतपाणी घालण्याचे काम करत आहे. पण त्यांचा डाव यशस्वी होणार नाही, असे त्यांनी सांगितले. शिरीष बुटाला म्हणाले, सत्तेपासून बाहेर राहिल्यामुळे भाजपची माशासारखी तडफड होत आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण हा त्यांचा डाव यशस्वी होणार नाही. त्यांच्यावरच हा डाव पलटेल, असेही ते म्हणाले.