मंत्रालयासमोर साक्षात शिवशाही अवतरली, मंत्र्याच्या बंगल्याना आता शिवरायांच्या गडकोटांची नावे; मुख्यमंत्र्याची संकल्पना साकार

मंत्र्याच्या बंगल्यांचे क्रमांक काढून टाकून त्यांना शिवरायांच्या किल्ल्याची नावे देवून नवी ओळख देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. त्यानुसार आता मंत्रालयासमोर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा अ६ हा बंगला रायगड या नावाने तर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ब२ बंगला रत्नसिंधु यानावाने ओळखला जाणार आहे.

  मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येवून दोन वर्षांचा कार्यकाळ उलटून गेला आहे. गेल्या काही महिन्यात मंत्रालय आणि त्या समोर असलेल्या मंत्री निवास स्थानांमध्ये मंत्र्याच्या दालनांवर आणि बंगल्याच्या सुशोभिकरणावर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्यावरून सरकारवर टिका देखील झाली. आता त्याच मंत्र्याच्या बंगल्यांचे क्रमांक काढून टाकून त्यांना शिवरायांच्या किल्ल्याची नावे देवून नवी ओळख देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. त्यानुसार आता मंत्रालयासमोर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा अ६ हा बंगला रायगड या नावाने तर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ब२ बंगला रत्नसिंधु यानावाने ओळखला जाणार आहे.

  मंत्रालया समोर साक्षात शिवशाही अवतरली

  या पूर्वी मलबारहिल येथील बंगल्याना विशिष्ट नावे देण्यात आली होती मात्र मंत्रालयासमोरच्या बंगल्याना क्रमांकाने ओळखले जात होते. मात्र या बंगल्याना देखील आता नवी ओळख मिळाली आहे.

  त्यानुसार आत जितेंद्र आव्हाड यांच्या अ३ बंगल्याला शिवगड, दादा भुसे यांच्या अ४ बंगल्याला राजगड, केसी पाडवी यांच्या  अ५ बंगल्याला प्रतापगड, अशी नवी ओळख मिळाली आहे.  विजय वडेट्टीवार यांच्या ब१ बंगल्याला सिंहगड, अमित देशमुख यांचा ब ३ आता जंजीरा, वर्षा गायकवाड यांचा ब ४ बंगला पावनगड, हसन मुश्रीफ यांचा ब५ आता विजयदुर्ग यशोमती ठाकूर यांचा ब ६ बंगला सिध्दगड सुनिल केदार यांचा ब७ बंगला पन्हाळगड, गुलाबराव पाटील यांचा क१ सुवर्णगड, सांदिपान भुमरे यांचा क२ बंगला ब्रम्हगिरी,  अनिल परब यांचा क५ बंगला अजिंक्यतारा बाळासाहेब पाटील यांचाक६ बंगला प्रचितगड, क-३ बंगला पुरंदर, क-४ बंगला शिवालय, क ७ बंगला जयगड, क ८ बंगला विशाळगड अस्या नव्याने नावाने ओळखले जाणार आहेत.

  मुख्यमंत्र्याच्या संकल्पनेतून शिवरायांच्या गडकोटांची नावे या बंगल्याना मिळाल्याने साक्षात शिवशाही महाविकास आघाडीत अवतरल्याचे दिसत आहे.

  चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

  मंत्र्याच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावं देण्याचा निर्णय #MVA सरकारनं घेतलाय… निर्णयाचं स्वागत!
  पण… जर मंत्र्यानी जनतेची सेवा करण्यात कुचराई केली तर त्याच किल्ल्यावरून त्या मंत्र्यांचा कडेलोट करण्याचीही हिम्मत सरकारनं दाखवावी… असं ट्विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे.