धक्कादायक! साेेनसाखळीसाठी चार वर्षांच्या मुलीवर धारदार शस्त्राने वार

सोनसाखळी चोर आता महिलांबरोबरच लहान मुलांना देखील आता लक्ष करत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांचे मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

  सिडको :  सिडको परिसरासह शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे महिला वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सिडकोतील हनुमान चौक येथील एका चार वर्षीय चिमुरडीच्या गळ्यातील सोन्याचे पेंडल खेचून नेण्याचा प्रयत्न करत धारदार शस्त्राने तिच्या हातावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली अाहे.

  शस्त्राने वार
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवनी मयूर पगारे (४, रा. हनुमान चौक, सिडको) ही सोमवारी दुपारी घराबाहेर खेळत असताना पत्ता विचारण्याच्या बहानाने दुचाकीवर आलेल्या अज्ञात इसमाने तिच्या गळ्यातील १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम पान खेचून नेण्याचा प्रयत्न केला तिने विरोध करत संशयित सोनसाखळी चोरट्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले. यावेळी अवनीने आरडाओरड केल्यानंतर चोरटा सोन्याचे पेंडल सोडून त्याने तेथून पळ काढला. धारदार शस्त्राने वार केल्याने तिच्या हातावर गंभीर जखम झाली.

  गुन्हा दाखल
  याप्रकरणी अंबड पाेिलस ठाण्यात संशयित अज्ञात चाेरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. वरिष्ठ पाेिलस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

   पोलिसांचा वचक नाही
  सोनसाखळी चोर आता महिलांबरोबरच लहान मुलांना देखील आता लक्ष करत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांचे मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. या घटनेने असे दिसून येते की पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कमी झालेला आहे.