चिनी मोबाईल कंपनी Oppo आणि Xiaomi ग्रुपशी संबंधित मुंबई, दिल्ली, बंगळुरूसह देशात ३० ठिकाणी एकाच वेळी इन्कमटॅक्सची धाड

देशभरातील चिनी मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. सकाळपासूनच दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद, बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये झाडाझडती घेण्यात आली. याआधी मंगळवारी नेपाळनेही अनेक चिनी कंपन्यांना काळ्या यादीत टाकले असल्याची माहिती समोर आली होती. चिनी मोबाईल कंपन्यांनी नियम मोडले असून आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती समोर आली आहे(Simultaneous income tax raids at 30 locations across the country, including Mumbai, Delhi and Bangalore, affiliated with Chinese mobile companies Oppo and Xiaomi Group).

  मुंबई : देशभरातील चिनी मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. सकाळपासूनच दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद, बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये झाडाझडती घेण्यात आली. याआधी मंगळवारी नेपाळनेही अनेक चिनी कंपन्यांना काळ्या यादीत टाकले असल्याची माहिती समोर आली होती. चिनी मोबाईल कंपन्यांनी नियम मोडले असून आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती समोर आली आहे(Simultaneous income tax raids at 30 locations across the country, including Mumbai, Delhi and Bangalore, affiliated with Chinese mobile companies Oppo and Xiaomi Group).

  मोबाईल कंपनी ओप्पो ग्रुप विरोधात आयकर विभागाने कारवाई केली. विभागाने ओप्पो ग्रुपशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकारी, संचालक, सीएफओ आणि इतर अधिकाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकले.

  करसंबंधित नियमांचे उल्लंघन

  आयकर विभागाचे हे छापे केवळ कंपन्यांच्या कार्यालयापुरते मर्यादित राहिलेले नसून गोडाऊन आणि इतर ठिकाणीही छापे टाकण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. याआधीही देशातील तपास यंत्रणांनी चिनी कंपन्यांवर कारवाई केली आहे. यापूर्वीही छापे टाकण्यात आले होते. अलीकडेच चीनच्या झेडटीई कंपनीवरही आयटी छापा टाकण्यात आला होता. गुरुग्राममध्ये पडलेला हा छापा अनेक तास चालला. तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, कंपनीने कराशी संबंधित अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे.

  30 ठिकाणी छापेमारी

  दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आणि पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता यासह देशातील सुमारे 30 ठिकाणी आयकर विभागाने मोठे छापे टाकले आहेत. यादरम्यान आयकर विभागाला कोट्यवधी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाची माहिती मिळाली आहे. आयकर विभागाची ही कारवाई यूपीमधील लखनऊ, मैनपुरी आणि मऊ, बंगालमधील कोलकाता, कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आणि दिल्ली-एनसीआरमधील जवळपास 30 ठिकाणी करण्यात आली. या छाप्यांदरम्यान आयकर विभागाला बनावट पावत्या, अघोषित गुंतवणूक, स्वाक्षरी केलेले धनादेश आणि अघोषित उत्पन्नाचे पुरावे सापडले आहेत.

  अघोषित उत्पन्नाचे पुरावे सापडले

  86 कोटींच्या अघोषित उत्पन्नाचे पुरावे प्राप्तिकर विभागाला मिळाले आहेत. त्याचवेळी 68 कोटींचे अघोषित उत्पन्न मान्य करण्यात आले आहे. मात्र, दीडशे कोटींच्या रकमेच्या विनियोगाची कागदपत्रे अधिकाऱ्यांना मिळालेली नाहीत. दुसऱ्या अन्य् ठिकाणाहून, आयकर विभागाला 12 कोटींची अघोषित गुंतवणूक आणि 3.5 कोटींची बेनामी मालमत्ता मिळाली आहे.