‘या’ जिल्ह्यात आहे अजब परंपरा; डीजे, हळद आणि प्री-वेडिंग शूटवर बंदी; नवरदेवाला दाढी करणंही बंधनकारक

विवाहांमध्ये होणारा अवाजवी खर्च रोखण्यासाठी सिरवी समाज पुढे आला आहे. फालतू खर्च थांबवण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

  लग्न (Marriage) म्हण्टलं की डेकोरेशन, महागडे कपडे, प्री-वेडिंग शूट (Prewedding ) हे सगळं आलंच. आजकाल याच्याशिवाय लग्नसमारंभ पुर्ण होत नाही. यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची वधू-वर पक्षाची तयारी असते. मात्र,  गेल्या काही वर्षांपासून विवाहसोहळ्यांमध्ये होणाक अनावश्यक खर्च रोखण्यासाठी राजस्थानमधील सिरवी समाज पुढे आला असून, या समाजाच्या वतीने अनावश्यक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये डीजेसह मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी आहे. तर, प्री-वेडिंग शूटिंग आणि लग्नापूर्वी मुला-मुलीसोबत बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नेमकं काय आहे हा प्रकार, पाहुया.

  [rea_also content=”कोण आहेत जेम्स मारापे, ज्यांनी पंतप्रधान मोदींसाठी मोडली स्वतच्या देशाची परंपरा, पाया पडून केलं मोदींच स्वागत~https://www.navarashtra.com/world/who-is-james-marape-papua-new-guinea-leader-who-touched-pm-modis-feet-nrps-402403/”]

  भारतीय संस्कृती आणि प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न

  हे संस्कृतीच्या विरोधात असल्याचे सांगून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सिरवी समाजाच्या वतीने विवाह सोहळ्यातील वाढत्या बजेटला आळा घालण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन अप्रत्यक्षपणे मध्यम व गरीब घटकांना दिलासा मिळाला आहे.

  पैशाच्या उधळपट्टीवरही बंदी घालणं आवश्यक

  सध्या लग्न समारंभाआधी हजारो रुपये खर्च करुन प्री-वेडिंग शूट करण्यात येतो. जगभारात याचा ट्रेंड वाढला आहे, ज्यामध्ये खूप पैसाही खर्च केला जातो. तसेच सर्वच लग्नसमारंभात मोठ्या आवाजात डीजे वाजवणे ही एक फॅशन बनली आहे, त्यामुळे यापूर्वीही अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्यासाठी आता अनेक समाज पुढे आले आहेत. त्याअंतर्गत या कार्यक्रमांवर बंदी घालण्यासह उधळपट्टी थांबवण्याच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, जे खरोखरच कौतुकास पात्र तसेच अनुकरणीय आहेत.

  हळदी समारंभावरही बंदी

  बैठकीत असेच काही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. या बैठकीत विवाह सोहळ्यात होणारा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी बांदोलीत डीजे आणि हळदी समारंभावरही बंदी घालण्यात आली आहे. यासह आता या कार्यक्रमांमध्ये वराला क्लीन मुंडण करून यावे असा नियम करण्यात आला आहे, म्हणजेच आता वराला दाढी वाढवून मिरवणूक काढता येणार नाही.

  नवरदेवाला करावी लागेल दाढी

  लग्नासंबधी नियम बनवताना असे आणखी विचित्र नियम बनवण्यात आले आहे.  दाढी करुन न आल्यास मिरवणुकीत येण्यास बंदी घालण्यात आली होती.  नवरदेवाने दाढी न करून येणे हे आमच्या परंपरेत नाही, त्यामुळे वधूला नेण्यासाठी वराला क्लीन शेव्हच करावे लागेल.