झोपेत असलेल्या गरोदर पत्नी आणि स्वतः मुलीची गळा आवळून हत्या; खून केल्यानंतर सैन्यदलातील जवानाने गाठले पोलीस स्टेशन, वाचा सविस्तर

  नांदेड : भारतीय सैन्यदलात असलेल्या जवानाकडून पोटच्या मुलीचा आणि पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बोरी येथे घडल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  कंधार तालुक्यातील बोरी येथील हत्याकांड

  गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची पतीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. हत्येनंतर आरोपी पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. कंधार तालुक्यातील बोरी येथे हे हत्याकांड घडले. एकनाथ जायभाये असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  आरोपी एकनाथ जायभाये हा सैन्यदलात

  आरोपी एकनाथ जायभाये हा सैन्यदलात आहे. राजस्थानमधील बिकानेरमध्ये सध्या तो नियुक्त आहे. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पत्नी आणि चार वर्षांची मुलगी सरस्वती दोघे झोपेत असताना त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. पत्नी भाग्यश्री ही आठ महिन्यांची गरोदर होती. हत्येनंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वतः माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.

  मुलगा का झाला नाही असे म्हणत पत्नीचा छळ

  आरोपीने या घटनेची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. भाग्यश्री जायभाये यांचा विवाह 2019 साली एकनाथ जायभाये यांचा सोबत झाला होता. त्यानंतर त्याला एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर मुलगा का झाला नाही असे म्हणत भाग्यश्रीला माहेरी जाऊन पैसे आण म्हणत तिचा छळ सुरू केला होता. तशी तक्रार भाग्यश्रीच्या आईने केली असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.