crime

दरम्यान संतापलेल्या पोलिसांनी शिंदे नामक व्यक्तिला यांना मारहाण करत तिथून पळ काढला. या प्रकरणी अनेक चर्चांना उधाण आलं असून दारूची पार्टी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    नाशिक : दारु पिऊन धिंगाणा करणाऱ्यांची पोलिसांत तक्रार करायला गेलेल्या नागरिकांवर त्या पोलिसांचीच तक्रार करण्याची वेळ आली आहे. गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत काल रात्रीच्या सुमारास 4 ते 5 पोलीस कर्मचारी ओली पार्टी करताना आढळून आले. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

    परिसरातील काही  टवाळखोर लोक दारु पिऊन धिंगाणा घालत होते. याबाबत तक्रार देण्यासाठी काही जण पोलीस चौकीमध्ये गेले होते. तेव्हा पाच ते सहा पोलीस कर्मचारी दारू पीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी लगेच आपला मोबाईल काढून या पोलिसांचं चित्रीकरण केलं. दरम्यान संतापलेल्या पोलिसांनी शिंदे नामक व्यक्तिला यांना मारहाण करत तिथून पळ काढला. या प्रकरणी अनेक चर्चांना उधाण आलं असून दारूची पार्टी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.