सोनाली फोगाट यांना ज्या हॅाटेलमध्ये ड्रग्स देण्यात आलं होतं ते कार्लिस हॉटेल सील!

कर्लिस हे तेच रेस्टारंट आहे जीथं सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी सोनाली फोगटला ड्रग्जचा ओव्हरडोज दिला होता.

    भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat Death Case) यांच्या हत्येप्रकरणी रोज काहीतरी नवी माहिती समोर येताना दिसत आहे. या प्रकरणी काही दिवसापुर्वी गोव्यातील कर्लिज हॉटेलच्या मालकासह ड्रग्ज पेडलरला करण्यात आली होती. आता हे कर्लिज हॉटेल सील करण्यात आलं आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली.

    भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पिएसह त्याच्या साथिदाराला नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांनातर गोव्यातील कर्लिज हॉटेलच्या मालकासह ड्रग्ज पेडलरला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तर, गोव्याच्या एनडीपीएस कोर्टाने कर्लिस रेस्टॉरंटचे मालक एडविन न्युन्सला जामीन मंजूर केला आहे. एडविनला 30 हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि जामिनासाठी 15-15 हजार रुपयांचे दोन जामीन द्यावे लागतील. कर्लिस हे तेच रेस्टारंट आहे जीथं सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी सोनाली फोगटला ड्रग्जचा ओव्हरडोज दिला होता. आता हे हॉटेलच सिल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या हॅाटेलच्या ड्रग्जसाठा जप्त केला आहे.

    [read_also content=”पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांची पाकिस्तानी चाहत्याला मारहाण, स्टेडियमची देखील तोडफोड~https://www.navarashtra.com/sports/after-the-defeat-the-afghan-fans-beat-up-the-pakistani-fan-also-vandalized-the-stadium-323482/”

    दरम्यान, सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचे नातेवाईकांनी  सीबीआय चौकशीसाठी भारताचे मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले, ‘गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु नाहीये. त्यामागे राजकीय दबाव हे कारण असू शकतो, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आता आम्ही गोवा उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत.’