१३ डिसेंबर : २००१ साली जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबाच्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.

    घटना.

    १९३०: प्रभातचा उदयकाल हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

    १९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

    १९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

    २००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.

    २००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.

    २०१६: सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.

    २०१६: अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.