१३ जानेवारी : १९६४ साली कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार

    घटना.

    १६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.

    १८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

    १९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.

    १९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.

    १९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.

    १९५७: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.

    १९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.

    १९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.

    १९९६: पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेसहि रेल्वेगाडी सुरु झाली.

    २००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.