१६ डिसेंबर : १९८५ साली कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक First Breeder Reactor राष्ट्राला समर्पित करण्यात आले.

    घटना.

    १४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

    १७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी.

    १८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.

    १९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

    १९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.

    १९३२: प्रभातचा मायामच्छिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला.

    १९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

    १९७१: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.

    १९८५: कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक First Breeder Reactor राष्ट्राला समर्पित.

    १९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

    २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.