
घटना.
१७१८: ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
१७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
१९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
१९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
१९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन.
१९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
२०१६: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
२०१६: आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
२०१६: विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले.