१८ डिसेंबर : २०१६ साली भारतीय ज्युनिअर हॉकी टीमने बेल्जियमला हरवून जुनिअर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.

    घटना.

    १२७१: कुबलई खान यांनी साम्राज्याचे नाव युआन करून राजवंश सुरू केले.

    १७७७: अमेरिकेत पहिले थँक्सगिव्हिंग साजरे करण्यात आले.

    १८३३: रशियन साम्राज्याचे राष्ट्रगीत गॉड सेव्ह द झार! हे पहिल्यांदा गायले गेले.

    १९३५: श्रीलंकेत लंका सम समाज पार्टी ची स्थापना केली.

    १९५८: जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले.

    १९५९: ब्रिटीश रॉयल नेव्ही मध्ये एचएमएस हार्मिस हि युद्धनौका दाखल झाली.

    १९७८: डॉमिनिक देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

    १९८९: सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

    १९९५: अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.

    २००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.

    २०१६: इंडोनेशियन हवाई दलाचे वाहतूक विमान पापुआ मधील दुर्गम भागात प्रशिक्षण व्यायाम करताना डोंगरावर क्रॅश झाले, त्यात विमानातील सर्व जण ठार झाले.

    २०१६: भारतीय ज्युनिअर हॉकी टीम ने बेल्जियम ला हरवून जुनिअर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.