२८ डिसेंबर १९४८ साली मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.

  घटना.

  १६१२: गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.

  १८३६: स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

  १८४६: आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.

  १८८५: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला.

  १९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे निधन.

  १९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.

  १९९५: कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.