८ डिसेंबर : १९३७ साली भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.

  घटना.

  १७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.

  १९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.

  १९४१: दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.

  १९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.

  १९७१: भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.

  १९८५: सार्क परिषदेची स्थापना.

  २००४: रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.

  २००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.

  २०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.