ड्रोनद्वारे सहा मिनिटांत एका एकरात फवारणी; नागपूरच्या युवकाचे संशोधन; मोबाईल आणि रिमोटने संचलन

शहरातील जे. डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेणाऱ्या निशांत गाढवे याने तयार केलेले ड्रोन शहरात सुरू असलेल्या अ‍ॅग्रोव्हीजनमध्ये ठेवण्यात आले आहे. या ड्रोनकडे सर्वांचेच लक्ष वेधले जात असून प्रामुख्याने शेतकरी वर्ग त्याची उपयुक्तता जाणून घेत आहेत. मजुरांद्वारे शेतीवर औषध फावरणी करायची तर एका दिवसात केवळ दोन ते तीन एकरातच फवारणी होते. मात्र, निशांतने तयार केलेल्या या ड्रोनमुळे एक एकर शेतीवर केवळ सहा मिनिटात औषध फवारणी केली जाते.

    नागपूर (Nagpur): भारताचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे आणि याच शेतीला भारतातली तरुणाई अत्याधुनिकीकरणाची जोड देत आणखी सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. उपराजधानीतल्या अवघ्या तिशीच्या आतील तरुणाने असेच एक संशोधन केले आहे. निशांत गाढवे अस या तरुण अभियंत्याचे नाव. त्याने तयार केलेल्या ड्रोनद्वारे सहा मिनिटांत एका एकरात फवारणी करता येते.

    शहरातील जे. डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेणाऱ्या निशांत गाढवे याने तयार केलेले ड्रोन शहरात सुरू असलेल्या अ‍ॅग्रोव्हीजनमध्ये ठेवण्यात आले आहे. या ड्रोनकडे सर्वांचेच लक्ष वेधले जात असून प्रामुख्याने शेतकरी वर्ग त्याची उपयुक्तता जाणून घेत आहेत. मजुरांद्वारे शेतीवर औषध फावरणी करायची तर एका दिवसात केवळ दोन ते तीन एकरातच फवारणी होते. मात्र, निशांतने तयार केलेल्या या ड्रोनमुळे एक एकर शेतीवर केवळ सहा मिनिटात औषध फवारणी केली जाते. एका दिवसात दहा ते १५ एकर शेतीवर औषध फवारणी शक्य होते. ड्रोनद्वारे फवारणी केली तर शेतीवर फवारण्यात येणाऱ्या औषधाची सुद्धा बचत होते.

    कारण ड्रोनमुळे औषधांचे अगदी लहान लहान थेंब तयार होतात आणि समान रुपाने पिकांच्या पानांवर पडतात. त्यामुळे औषध आणि पाणी या दोन्हीची बचत होते. ऊसासारख्या उंच वाढणाऱ्या पिकांवर मजुरांद्वारे औषध फवारणी शक्य होत नाही. त्याठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून सहज फवारणी करता येऊ शकते. विशेष म्हणजे, पर्यावरण आणि जीवांचे देखील संरक्षण होते. ड्रोनद्वारे फवारणी केल्यास औषधे वातावरणात कमी प्रमाणात पसरतात. त्यामुळे फवारणी करतेवेळी मजूर फार वेळ हानीकारक औषधांच्या संपर्कात येत नाही. साडेतीन लाख रुपयात तयार केलेल्या या ड्रोनमध्ये औषधांसाठी दहा लीटरची टाकी आहे. या दहा लीटर औषधांमध्ये एक एकर शेतीवर फवारणी होते. ड्रोन चार्ज करण्यासाठी ३० मिनिटांचा कालावधी लागतो. रिमोट किंवा भ्रमणध्वनीच्या सहाय्याने तो ऑपरेट करता येतो.