
यावेळी पालकमंत्री आणि स्वागताध्यक्षय छगन भुजबळ यांनी माधमाशी सवांद साधताना केंद्राने मराठी भाषेवर अन्याय केला, तसेच अजून प्रयन्त केंद्राने मराठी भाषेला अभिजित दर्जा का दिला नाही? असा प्रश्न उपस्थित केला
नाशिक, कुसुमाग्रजनगरी, मेट, ९४ वे अखिल भारतीय साहित्य समेलनला आज सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात झालीआहे. सकाळी ग्रंथदिंडी कुसुमाग्रज यांचे निवासस्थान येथून ते साहित्य समेलन स्थळी दाखल झाली आहे. दरम्यान आज दुपारी मराठी भाषा अभिजित दालनाचे उद्घाटन करण्यात आले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आता सर्वसामान्य नागिरकांनी पुढाकार घेऊन राष्ट्रपतींना पत्रे पाठवावीत, असे आवाहन राज्याचे मराठी भाषा आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.
नाशिकच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याबाबत जागृतीसाठी मराठी अभिजात दालन उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन करताना सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी पालकमंत्री आणि स्वागताध्यक्षय छगन भुजबळ, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, प्रा. हरी नरके, कौतिकराव ठाले-पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान संपूर्ण देशात केंद्राने 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यात दक्षणेकडील संस्कृत, मल्याळम, तामीळ, कन्नड, ओदिला या भाषांचा समावेश आहे. मात्र मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेले काही वर्षे सातत्याने प्रयत्न करुनही त्याला यश मिळालेले नाही. केंद्र सरकारच्या भाषा तज्ज्ञ समितीकडेही याबाबतचे सर्व पुरावे देण्यात आले आहेत.
त्यांनी ते निकष मान्यही केले असून, त्याबाबतची शिफारस केंद्र सरकारकडेही केली आहे. मात्र अद्यापही त्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेत नसल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली मात्र अजूनही याबाबत निर्णय झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आता यापुढे सर्वसामान्य मराठी नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा व राष्ट्रपतींकडे ही मागणी पोस्टकार्डाद्वारे पत्र पाठवून करावी, या उपक्रमाची सुरुवात साहित्य संमेलनात करण्यात आली आहे. असं सुद्धा मंत्री सुभाष देसाई म्हनाले.
यावेळी पालकमंत्री आणि स्वागताध्यक्षय छगन भुजबळ यांनी माधमाशी सवांद साधताना केंद्राने मराठी भाषेवर अन्याय केला, तसेच अजून प्रयन्त केंद्राने मराठी भाषेला अभिजित दर्जा का दिला नाही? असा प्रश्न उपस्थित केला तसेच मराठी भाषा खूप जुनी आणि स्वतंत्र आहे. ती कोणाशीही संग्न्य नाही. आणि या भाषेत गोडवा आहे. त्यामुळे या भाषेला अभिजित दर्जा मिळाला पाहिजे असं भुजबळ म्हणले.