राज्यात पुन्हा निर्बंध; तिसऱ्या लाटेबाबत मंत्री नवाब मलिक म्हणाले…

राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. काल यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

    मुंबई : महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. काल यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

    नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

    काल कॅबिनेटमध्ये कोविडबाबत चर्चा झाली. कॅबिनेटमध्ये आराखडा देत असताना लक्षात आलं की कोरोना रुग्णांमध्ये रोज 18 टक्क्यांनी वाढ होत आहे.  ओमायक्रॉनचे संकट वाढत चाललं आहे. यामुळं जानेवारीत तिसरी लाट येऊ शकते, असं मलिक यांनी म्हटलं आहे.  हायकोर्टाने सांगितलं आहे की तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे निवडणूक पुढे ढकलायली हवी. जर निवडणूका झाल्या नाहीत तर राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. पंजाबमध्ये अशी परिस्थिती होऊ शकते, असंही मलिक म्हणाले.

    दरम्यान मुस्लिम आरक्षणावर बोलताना नवाब मलिक यावेळी म्हणाले की, खासदार इम्तियाज जलील पत्रकार होते. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते बॅरिस्टर आहेत. त्यांच्या अध्यक्षांनी मला सांगावं की आरक्षण 50 टक्क्यांच्या पुढे कसं द्यायचं. घटनेची दुरुस्ती होणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.