राज्याचं टेन्शन वाढलं; ओमिक्रॉनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

राज्यात ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. अगोदरच राज्यात 10 रूग्ण आढळले होते. अशातच आता आज आणखी 10 रूग्ण आढळलं आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

    मुंबई : कोरोना महामारीनं गेल्या दीड वर्षापासून अवघ्या जगाचं नुकसान केलं आहे. कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी सध्या लसीकरणावर अधिक भर देण्यात येत  आहे.

    अशातच नव्या ओमिक्राॅन व्हेरियंटनं पुन्हा सर्वाना चिंतेत टाकलं आहे. सध्या ओमिक्राॅनच्या रूग्ण संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येबात गंभीर माहिती दिली आहे.

    राजेश टोपे नेमकं काय म्हणाले? 

    राज्यात ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. अगोदरच राज्यात 10 रूग्ण आढळले होते. अशातच आता आज आणखी 10 रूग्ण आढळलं आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटनं सर्वत्र धुमाकुळ घातला आहे. सरकारनं सर्वत्र चाचण्या वाढवण्याचं आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेचं राज्यात सध्या स्वॅब जीनोम सिक्वेंसिंगसाठी लॅब उभारण्यात येत असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. आमच्याकडं सध्या स्वॅबसाठी तीन लॅब आहेत. नागपूर आणि औरंगाबाद येथे लवकरच नवीन लॅब सुरू करण्यात येणार आहेत. विदेशातून येणाऱ्या प्रवाशी विमान वाहतुकीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं टोपे म्हणले आहेत.

    दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा ओमिक्राॅनचा रूग्ण आढळला होता. त्यानंतर सर्वत्र विमान प्रवासावर अधिक बंधन लादण्यात आली आहेत. तरीही राज्यातील रूग्णांचा आकडा वाढत चालल्यानं सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.