कोतवाल संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन ; मागण्या मान्य न झाल्यास १३ तारखेपासून बेमुदत संप

झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारने कोतवाल बांधवांच्या मागण्या जर येत्या १२ तारखेपर्यंत मान्य न केल्यास १३ तारखेपासून मुंबई येथे राज्यातील १२ हजार कोतवाल बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार केला असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने बैठक घेऊन कोतवालांचा विषय निकाली काढावा अन्यथा होणाऱ्या नुकसानी राज्य शासन स्वतः जबाबदार राहणार आहे. त्यामुळे तातडीने बैठक लावून गेल्या पन्नास वर्षांपासून च्या मागणीचा निर्णय व्हावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

    सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आंदोलना पाठोपाठ आता , महसूल विभागाचा कान, नाक, डोळे, समजले जाणारा तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रत्येकांच्या शंकेचे निरसन करणाऱ्या हा कोतवाल गेल्या ६० वर्षांपासून चतुर्थ श्रेणी साठी सतत झगडत असून, आजतागायत देखील कोटवालांना न्याय मिळाला नाही. या झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारने कोतवाल बांधवांच्या मागण्या जर येत्या १२ तारखेपर्यंत मान्य न केल्यास १३ तारखेपासून मुंबई येथे राज्यातील १२ हजार कोतवाल बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार केला असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने बैठक घेऊन कोतवालांचा विषय निकाली काढावा अन्यथा होणाऱ्या नुकसानी राज्य शासन स्वतः जबाबदार राहणार आहे. त्यामुळे तातडीने बैठक लावून गेल्या पन्नास वर्षांपासून च्या मागणीचा निर्णय व्हावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

    कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणी देण्यात यावी. कोतवालांना तलाठी व तत्सम पदभरती मध्ये२५% आरक्षण देण्यात यावे. कोतवाल संघटनेस शासन मान्यता देण्यात यावी. अशा विविध मागण्यांसाठी कोतवाल हे बेमुदत आंदोलनाच्या पवित्र्यात असून, या आंदोलना संदर्भात जुने पुरावे शासन निर्णयांचा संदर्भ घेऊन निवेदन देण्यात आले असून,ज्यामध्ये १९८० च्या दशकातील निवडणुकी पूर्वीचा वचननामा, १९८३ मध्ये तत्कालीन महसूलमंत्री यांनी चयुर्थ श्रेणी बाबत निर्णय घेण्याकरिता दिलेले पत्र, चतुर्थ श्रेणी ला मंत्रिमंडळाच्या मंजुरी एका महिन्याच्या आत सादर केले जाईल या संदर्भातील ३० मार्च २०११ रोजी च्या वर्तमानपत्रातील कात्रण , गुजरात राज्याने कोतवालाना चतुर्थ श्रेणी लागू केल्याबाबतच्या शासन निर्णयाची २० एप्रिल १९७९ रोजीची प्रत, २०१४ मध्ये कोतवाल यांना तलाठी आरक्षणाबाबत १०% आरक्षण देण्याबाबत बैठकीचे इतिवृत्त, यांसह विविध प्रकारचे पुरावे, शासन निर्णय , जोडून मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोतवाल संघटनेने लेखी निवेदन देत जर मागण्या येत्या १२ तारखेपर्यंत मान्य न झाल्यास १३ तारखेपासून बेमुदत संप करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

    राज्याध्यक्ष शिवप्रसाद देवणे, राज्य सरचटणीस कृष्णा शिंदे, उपाध्यक्ष संतोष ठाकूर, विभागीय अध्यक्ष सोमनाथ गवळी, विभागीय उपाध्यक्ष विवेकानंद पांचाळ, विठ्ठल गुरव, रोशन जोगे, उत्तम पाचभाई, राजकुमार साठे, युवराज यादव बाळा भोनकर प्रविण चिखलीकर शशिकांत निमसटकर, अंबादास यामजले, दयानंद कांबळे यांच्या स्वाक्षरी निवेदन देण्यात आले आहे.