निरपराध नागरिकांवरील कारवाई थांबवा; भाजपची मागणी

मालेगाव, नांदेड व अमरावती येथील निरपराध नागरिकांवर होत असलेली कारवाई थंबवावी, अशी मागणी भाजप साताराचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

    सातारा : मालेगाव, नांदेड व अमरावती येथील निरपराध नागरिकांवर होत असलेली कारवाई थंबवावी, अशी मागणी भाजप साताराचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

    निवेदनात म्हणाले आहे की, त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते. जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर उतरले.

    दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींचमार्फत झाली पाहिजे. त्याचप्रमाणे ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे. दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे. स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी. तसेच भारतीय जनता पार्टीच्या नेते – कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे

    यावेळी सातारा जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे उपस्थित होते.