आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना अडविले

गुन्ह्यात आरोपीला तपासासाठी ताब्यात घेण्यास हे पथक अमिर काम करत असलेल्या गोल्डन गॅरेजवर येथे गेले होते. त्यांनी अमिर याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमा केली. तसेच, शासकीय कामात अटकाव करण्याचा प्रयत्न केला व टॉमीने मारण्यासाठी अंगावर देखील धावून आले.

    पुणे : सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीला ताब्यात घेण्यास गेलेल्या पथकाला जमावाने धमकावत अपशब्द वापरून पोलीसांची वाहने अडविल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
    संतोष बाळासाहेब वाघमारे (वय ३५), दिपक विठ्ठल शिंदे (वय ३२), शिवाजी कांतीलाल काळभोर (वय ३९), अमिर गुरूलाल नदाफ (वय २२) व रोशन दिलीप कुंजीर (वय ३१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, इतर फरार झाले आहेत. याबाबत उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार पुणे-सोलापूर रस्त्यावर घडला आहे.
    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यासह विविध कलमानव्ये अमिर नदाफ याच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात त्याला तपासासाठी ताब्यात घेण्यास हे पथक अमिर काम करत असलेल्या गोल्डन गॅरेजवर येथे गेले होते. त्यांनी अमिर याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमा केली. तसेच, शासकीय कामात अटकाव करण्याचा प्रयत्न केला व टॉमीने मारण्यासाठी अंगावर देखील धावून आले. त्यानंतर वाहने घेऊन तक्रारदार निघत असताना त्यांची वाहने समोर उभा राहून अडविली. त्यांना अपशब्द वापरत धमकावून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.