पेट्रोलचे थेंब अंगावर पडल्याने महिलांमध्ये तुफान मारामारी; नागरिकांनी बनविला व्हिडिओ

पेट्रोप पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण होत असल्याचं पाहून पंपावरील इतर महिलाही पुढे आल्या आणि त्यांनी मिळून संबंधित महिलेला मारहाण केली. पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी भर रस्त्यात एका महिलेला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  नागपूर (Nagpur) : शहरातील एका पेट्रोल पंपावर महिलांमध्ये हाणामारी (Women free style fight in Nagpur) झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल (Women fight video goes viral) होत आहे. नागपूर शहरातील मेडिकल चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला होता. पेट्रोल भरत असताना कपड्यावर पेट्रोलचे थेंब उडल्याने वाद झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.

  पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यासोबत वाद
  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील एक महिला पंपावर पेट्रोल भरायला गेली होती. पेट्रोल भरत असताना तिच्या कपड्यांवर पेट्रोलचे काही थेंब उडाले. यानंतर त्या महिलने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

  पंपावरील महिलांनी केली मारहाण
  पेट्रोप पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण होत असल्याचं पाहून पंपावरील इतर महिलाही पुढे आल्या आणि त्यांनी मिळून संबंधित महिलेला मारहाण केली. पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी भर रस्त्यात एका महिलेला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये इंडियन ऑईल पेट्रोल कंपनीच्या तीन महिला लाल रंगांचा ड्रेस घातलेल्या एका महिलेला भर रस्त्यात मारत असल्याचं दिसत आहे.

  नागरिकांनी केले व्हिडीओ शूट
  ही घटना घडली त्यावेळी पेट्रोल पंपावर इतरही नागरिक उपस्थित होते. उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी काहींनी आपल्या मोबाइलमध्ये हा वाद आणि हाणामारीची घटना कैद केली. या हाणामारीचा व्हिडीओ आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.