तृणमूल-भाजपमध्ये जोरदार राडा; दिलीप घोष यांच्याविरोधात ‘गो बॅक’चा नारा

बंगालच्या बर्दवान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दिलीप घोष दुर्गापूरच्या न्यू टाऊनशिप पोलिस स्टेशन हद्दीतील फुलझार वळणावर पोहोचले होते. त्यानंतर दिलीप घोष यांना बघून काही लोकांनी 'गो बँक'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

    दुर्गापूर : बंगालच्या बर्दवान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दिलीप घोष दुर्गापूरच्या न्यू टाऊनशिप पोलिस स्टेशन हद्दीतील फुलझार वळणावर पोहोचले होते. त्यानंतर दिलीप घोष यांना बघून काही लोकांनी ‘गो बँक’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. तृणमूल कार्यकर्ते आणि समर्थकांनीच ‘गो बॅक’च्या घोषणा दिल्याचा आरोप आहे.

    तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. लष्कराच्या जवानांनी दिलीप घोष यांना घटनास्थळावरून दूर नेले. दोन गटातील हाणामारी थांबवण्यासाठी दुर्गापूर नवीन टाऊनशिप पोलिस ठाण्याच्या पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. पोलिसांनाही आंदोलनाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून ठिय्या आंदोलन केले.