लाच स्वीकारताना उपकोषागार ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून वीस वर्षांचा लाभ, वेतन आयोगाचा लाभ मंजूर करतो म्हणून तक्रारदार यांच्याकडे दोन हजारांची मागणी केली. पण, सोमवारी एक हजार रुपये स्वीकारताना सातारच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

    वाई : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून वीस वर्षांचा लाभ, वेतन आयोगाचा लाभ मंजूर करतो म्हणून तक्रारदार यांच्याकडे दोन हजारांची मागणी केली. पण, सोमवारी एक हजार रुपये स्वीकारताना सातारच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून उपकोषागार अधिकारी, कोषागार कार्यालय वाई वर्ग -2 सुधाकर शंकर कुमावत (वय ४१, मूळ रा फ्लॅट नंबर- बी-201, विलास सोसायटी, ससाणे नगर, हडपसर, पुणे सध्या रा. गीतांजली हॉस्पिटलजवळ, वाई) याला सोमवारी रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

    याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे तीन महिन्यांचा पगार, वीस वर्षांचा लाभ तसेच सातव्या वेतन आयोगाचा फरक असे एकूण 2 लाख ७७ हजार ६८५ रुपयांचे बिल मंजूर करून देतो म्हणून त्याचा मोबदला व पुढील बिल काढल्याचे कामाकरिता दोन हजार रुपये लाचेची मागणी सुधाकर शंकर कुमावत याने केली. तडजोडीअंती सोमवारी एक हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला वाईत रंगेहाथ पकडला. कुमावत याने तक्रारदार यांच्याकडे सुरूवातीला दहा हजारांची लाच मागितली होती.

    राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक पुणे परिक्षेत्र तसेच सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक व सुहास नाडगौडा, अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या उपस्थितीत सचिन राऊत, पोलीस निरीक्षक,
    पोलीस अंमलदार- विनोद राजे, संभाजी काटकर, निलेश येवले, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.