रक्ताचा कर्करोग झालेल्या रूग्णावर बोन मॅरो पध्दतीने यशस्वी उपचार

कराडचा रहिवासी असलेला ५३ वर्षीय रुग्ण ऑगस्ट २०२१ मध्ये डॉ विनोद पाटील यांना पाठदुखी व दम लागण्याच्या लक्षणाने भेटला. बोन मॅरो व रक्ताच्या तपासण्या केल्यावर त्याला मल्टीपल मायलोमा हा रक्ताचा कर्करोग असल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी त्याला कीमोथेरेपी देण्यात आल्या. ४ कीमोथेरेपी नंतर त्याचा आजार पूर्णपणे आटोक्यात आला.

    कॅन्सरवरील अत्यंत अवघड समजली जाणारी उपचारपद्धती असलेली बोन मॅरो ट्रान्सप्लांट प्रक्रिया नुकतीच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे पार पडली. सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर  रुग्णांसाठी जीवनदायी ठरले आहे.  कॅन्सरवर अत्याधुनिक उपचार करताना रक्तातील कॅन्सर बरा करणे आणि बोन मॅरो प्रत्यारोपण करणे ही अत्यंत आव्हानात्मक अशी उपचारपद्धती आहे. हे ऑपरेशन डॉक्टर विनोद पाटील यांच्या देखरेखीखाली पार पाडलं.

    या उपचारपद्धतीचा वापर हा रक्ताचा कर्करोग अथवा रक्ताच्या इतर आजारांवर होऊ शकतो. यामध्ये रोगग्रस्त अस्थिमज्जा पूर्णपणे निकामी करून त्याजागी निरोगी अस्थिमज्जांचे प्रत्यारोपण केले जाते. ही उपचारपद्धती साधारण १ महिन्यांपर्यंत चालते.

    कराडचा रहिवासी असलेला ५३ वर्षीय रुग्ण ऑगस्ट २०२१ मध्ये डॉ विनोद पाटील यांना पाठदुखी व दम लागण्याच्या लक्षणाने भेटला. बोन मॅरो व रक्ताच्या तपासण्या केल्यावर त्याला मल्टीपल मायलोमा हा रक्ताचा कर्करोग असल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी त्याला कीमोथेरेपी देण्यात आल्या. ४ कीमोथेरेपी नंतर त्याचा आजार पूर्णपणे आटोक्यात आला.

    हा आजार पुन्हा लवकर उद्भवु नये म्हणून त्याला अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा पर्याय देण्यात आला रुग्णाने पूर्ण संमती दिल्या नंतर त्याचा मूळ पेशी मिळवण्यासाठी अफेरेसिस करण्यात आले. दोनदा प्रयत्न करून सुद्धा आवश्यक तेवढ्या मूळ पेशी मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे मिळालेल्या मूळ पेशी व्यवस्थित जतन करून रुग्णाला डिस्चार्ज करण्यात आला.

    एका महिन्या नंतर पुन्हा अफेरेसिस केल्या नंतर आवश्यक प्रमाणात मूळ पेशी मिळवण्यात यश आले. त्यामुळे डॉ विनोद पाटील यांनी रुग्णास कंडिशनिंग प्रोटोकोल देऊन अस्थिमज्जा प्रत्यारोपण केले. त्या नंतर रुग्ण १७ दिवस एडमिट राहिला. या दरम्यान त्याला ताप येणे, उलटी होणे व भूक न लागण्याचा त्रास झाला. त्याच्या पांढऱ्या पेशी १२० पर्यंत कमी झाल्या. रुग्णास रक्त व प्लेटलेट्स आवश्यकतेनुसार देण्यात आले. अखेर १७ व्या दिवशी पेशी पूर्ण वाढल्या नंतर रुग्णास घरी सोडण्यात आले.