प्रेमविवाहानंतर 7 महिन्यातच उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या, लिहिली भावनिक सुसाईड नोट

लग्नानंतर सुहैलनं म्हटलं की त्याला चित्रपट निर्माता बनायचं आहे. यासाठी त्याने मोफियाकडे हुंडा म्हणून ४० लाख रुपये मागितले. मोफियाने यासाठी नकार दिला. यानंतर सासरकडच्या लोकांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली.

    तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) :  एका 21 वर्षाच्या लॉ स्टूडंटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Law Student Committed Suicide). केरळच्या (Kerala) इदायापुरममधील ही घटना असून मोफिया परवीन दिलशाद (Mofiya Parveen Dilshad) असं या तरुणीचं नाव आहे. मोफियाने आपल्या सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) लिहिलं, की बाबा, तुम्ही बरोबर होता. तो चांगला माणूस नव्हता. सुसाईड नोटमध्ये तिने आपला पती मोहम्मद सुहैल, सासरे यूसुफ आणि सासू रुखिया आपल्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

    वृत्तानुसार, मृत मोफियाच्या वडिलांनी सांगितलं, की त्यांच्या मुलीने आपल्या रुममधील सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या मुलीचा सासरी भरपूर छळ केला जात होता. तिला पती, सासू आणि सासरे या सर्वांनीच त्रास दिला.

    मोफियाच्या वडिलांनी सांगितलं की काही दिवसांआधी मोफियाने अलुवाच्या एसपीकडे तक्रार केली होती. यानंतर त्यांनी अलुवा पोलीस स्टेशनला कारवाईचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूकडील लोकांना पोलीस ठाण्यात बोलावलं. मात्र पोलिसांनी मोफियाच्या पतीची आणि तिच्या सासरकडच्या लोकांची बाजू घेतली. यामुळे मोफिया नाराज झाला आणि नंतर तिने गळफास घेतला.

    मोफिया आणि मोहम्मह सुहैलची भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. काही दिवस त्यांचं सतत एकमेकांसोबत बोलणं सुरू होतं. यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर याच वर्षी एप्रिल महिन्यात दोघांनी लग्न केलं. मोफियाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या वेळी मोहम्मद सुहैलने सांगितलं होतं की तो संयुक्त अरब अमीरातमध्ये नोकरी करतो आणि तो एक ब्लॉगरही आहे. मात्र, लग्नानंतर सुहैलनं म्हटलं की त्याला चित्रपट निर्माता बनायचं आहे. यासाठी त्याने मोफियाकडे हुंडा म्हणून ४० लाख रुपये मागितले. मोफियाने यासाठी नकार दिला. यानंतर सासरकडच्या लोकांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली.