वनरक्षक अवधूत पिसे यांची गळफास घेऊन आत्महत्या

मोरणा विभागातील पांढरपाणी येथील वन्यजीव विभागाच्या संरक्षण कुटीत वनरक्षक अवधूत सुभाष पिसे (वय ३५ सध्या रा. मोरगिरी, मूळ रा. माधवनगर, सांगली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Patan) केली.

    पाटण : मोरणा विभागातील पांढरपाणी येथील वन्यजीव विभागाच्या संरक्षण कुटीत वनरक्षक अवधूत सुभाष पिसे (वय ३५ सध्या रा. मोरगिरी, मूळ रा. माधवनगर, सांगली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Patan) केली.

    याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ढेबेवाडी वन्यजीव क्षेत्रातील नियत क्षेत्र आटोली परिसरातील आटोली ते पांढरपाणी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील वन्यजीव विभागाच्या संरक्षण कुटीत शुक्रवारी वनरक्षक अवधूत पिसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. एका सहकाऱ्याने त्यांना शनिवारी कामावर जाण्यासाठी फोन केला असता त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. तो कामावर पुढे गेला असेल म्हणून सदर कर्मचारी संरक्षण कुटीकडे गेला असता त्यास आत्महत्या केल्याचे लक्षात आले.

    घटनेची माहिती प्रथम वरिष्ठांना व पाटण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची फिर्याद संदीप जोपळे यांनी दिली असून हवालदार पगडे अधिक तपास करत आहेत.