Father commits suicide by attacking wife and child in Kalyan

कल्याण पश्चिमेकडील चिकणघर परिसरातील एका घरात सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह सापडला होता, तर त्याच घरात मोटरमनची पत्नी आणि मुलगाही गंभीररीत्या जखमी अवस्थेत सापडल्याची घटना काल उघडकीस आली होती. यानंतर महात्मा फुले पोलिसांनी शिताफीने तपास करून या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, मुलानेच जन्मदात्याची गळा चिरून हत्या केली, तर पतीला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या आईलाही आरोपी मुलाने गंभीर जखमी केले आहे. लोकेश बनोरिया (२७) असे आरोपी मुलाचे नाव असून, त्याने आधी वडिलांनीच माझ्यावर व आईवर हल्ला करून स्वतः आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता(Suicide or murder? The police found out right away; Thrilling events in a high profile society in Kalyan).

    कल्याण : कल्याण पश्चिमेकडील चिकणघर परिसरातील एका घरात सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह सापडला होता, तर त्याच घरात मोटरमनची पत्नी आणि मुलगाही गंभीररीत्या जखमी अवस्थेत सापडल्याची घटना काल उघडकीस आली होती. यानंतर महात्मा फुले पोलिसांनी शिताफीने तपास करून या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, मुलानेच जन्मदात्याची गळा चिरून हत्या केली, तर पतीला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या आईलाही आरोपी मुलाने गंभीर जखमी केले आहे. लोकेश बनोरिया (२७) असे आरोपी मुलाचे नाव असून, त्याने आधी वडिलांनीच माझ्यावर व आईवर हल्ला करून स्वतः आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता(Suicide or murder? The police found out right away; Thrilling events in a high profile society in Kalyan).

    मृत मोटरमन प्रमोद बनोरिया (५८) त्यांची पत्नी कुसुम (४५) व मुलगा आरोपी लोकेश कल्याण चिकणघर परिसरात निखिल हाईट्स या हायप्रोफाईल सोसायटी राहतात. काही दिवसांपासून बाप-लेकामध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यातच पुन्हा रविवारी रात्रीच्या सुमारास वाद होऊन बाप लेकामध्ये भांडण झाले होते.

    मात्र, वाद एवढा विकोपाला गेला की बापाचा आरोपी मुलाने चाकूने गळा चिरला. या हल्ल्यात बाप जागीच ठार झाला, तर आईला गंभीर जखमी करून आरोपी मुलाने स्वतःवरही चाकूने वार करून जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर मोटरमन प्रमोद बनोरिया यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलकडे पाठवून दिला होता.

    या घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील आपल्या पथकासोबत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पोहोचले तेव्हा या घरात लोकेश हा जखमी अवस्थेत आढळला. मोटरमन प्रमोद बनोरिया यांची पत्नी कुसुम हीदेखील जखमी अवस्थेत आढळून आली. घरात सर्वत्र रक्ताचा सडा पसरला होता. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज व्यक्त केला होता. लोकेश याने वडिलांना संपवून स्वतःसह आईला जखमी केले असावे, असे पोलिसांना सांगितले.

    दरम्यान, रात्री लोकेशने वॉचमनला फोन करून रुग्णवाहिका पाहिजे म्हणून सांगितले. तेव्हा मात्र वॉचमनला संशय आल्याने त्याने सोसायटीच्या इतर सदस्यांना ही माहिती दिली. सोसायटीच्या इतर सदस्यांनी बनोरिया यांच्या घरी जाऊन पाहिले असता सर्वत्र पसरलेले रक्त आणि मोटरमनचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार पाहून उपस्थित साऱ्यांना धक्का बसला.

    …अखेर प्रकरणाचा गुंता सुटला

    रहिवाशांनी या प्रकाराची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना दिली. परिममंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहायक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासाअंती या प्रकरणातील धक्कादायक तथ्य समोर आले आहे. जखमी आई व आरोपी मुलावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, पोलिसांनी तपासानुसार आरोपी मुलावर बापाची हत्या व आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली आहे.